Students Section

विद्यार्थ्यांसाठी नियम -

 

१) विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या वेळेपूर्वी १० मिनिटे अगोदर उपस्थित राहिले पाहिजे. कॉलेजचे सर्व तासिकांना नियमित उपस्थित असावे.

२) ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश आहे. विद्यार्थ्यांसाठी पांढरा शर्ट, पांढरी पँट, विद्यार्थ्यांनींसाठी गुलाबी पंजाबी ड्रेस, ओढणी.

३) सर्व विद्यार्थ्यांनी दररोज गणवेशात उपस्थित राहणे आवश्यक आहे. गैरहजर राहू नये अन्यथा दंड रू. ५०/- आकारण्यात येईल.

४) विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या वेळेमध्ये आपल्या कॉलेज बाहेरील मित्रांना बोलावू नये.

५) विद्यार्थ्यांनी आपल्या सायकलीस व दुचाकी वाहनास कुलूप लावून व स्वतःच्या जबाबदारीवर ठेवावे.

६) ओळखपत्रावर लावण्यासाठी गणवेशातील फोटो आवश्यक आहे.

७) प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ओळखपत्र दररोज बरोबर आणलेच पाहिजे.

८) शाळा आणि ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक, अधिकारी यांनी ओळखपत्र मागितल्याबरोबर सादर करणे आवश्यक आहे.

९) बोर्डाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक सत्रातील हजेरी स्वतंत्रपणे ७५ टक्के आवश्यक असते.

१०) वर्षभरात ज्युनि. कॉलेजमध्ये घेण्यात येणाऱ्या घटक चाचणी, प्रथम सत्र परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, वार्षिक परीक्षा

आणि इतर परीक्षेस विद्यार्थ्याने बसले पाहिजे आणि अभ्यासात प्रगती दाखविली पाहिजे ११) प्रत्येक सत्राचे शेवटी (ऑक्टोबर ते

जानेवारी) प्रात्यक्षिके (स्वाध्याय) पूप् करून ती निर्धारित वेळेमध्ये प्रमाणित करून घेतली पाहिजे.

१२) सर्व विषयांचे स्वाध्याय निर्धारित वेळेमध्ये पूर्ण करून ते विषय शिक्षकांकडून तपासून घेतले पाहिजे.

१३) एखाद्या परीक्षेला विद्यार्थी आजारपणामुळे उपस्थित राहू शकत नसेल त परीक्षा चालू असतांनाच पालकाने समक्ष येऊन

तसा अर्ज वैद्यकीय प्रमाणपत्रांसह द्यावा.

१४) शालेय वेळेत मोबाईल वापरता येणार नाही.

१५) पालकांना पाल्याची अभ्यासातील प्रगती कळावी म्हणूनच विद्यार्थ्यांनी प्रथम सत्रात परीक्षेचा निर्णय स्वतंत्र गुणपत्रक देऊन जाहीर करण्यात येतो तो पालकांनी अवश्य पहावा. घटक चाचणी परीक्षांचे निर्णय काच फलकामध्ये लावले जातात.

१६) इयत्ता ११ वी मधील विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये प्रत्येक विषयाची । २०० गुणांची परीक्षा घेण्यात येते.

घटक चाचणी - ५० गुण (दोन सत्रांत) प्रथम सत्रांत परीक्षा - ५० गुण वार्षिक परीक्षा १०० गुण

१७) सतत दोन महिने गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांची नांवे पटावरून कमी करण्यात येतील.

१८) विद्यार्थ्यांचे पालकांना अगोदर कळविल्याशिवाय आणि पालकांची लेखी संमती असल्याशिवाय कोणत्याही विद्यार्थ्यांस शैक्षणिक सहलीमध्ये प्रवेश मिळत नाही.