News Cover Image

संत गाडगे महाराज पुण्यतिथी साजरी.

पेठ-दिनांक २०/१२/२०२३ वार बुधवार रोजी डांग सेवा मंडळ नाशिक,संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे संत गाडगे महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी उपप्राचार्या श्रीमती जे.पी.पवार,श्री के.के.देशमुख,श्री पी.आर.वेढणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी श्री एस.जे.सोनवणे यांनी विद्यार्थ्याना संत गाडगे महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला.तसेच श्रीमती जे.पी.पवार यांनीही संत गाडगे महाराज यांचे विचार व कार्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी शालेय परिसराची स्वच्छता केली.