डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे
🌹 *श्रावण क्वीन स्पर्धेचे आयोजन* 🌹
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 पेठ - दिनांक 01/09/2026 वार मंगळवार रोजी डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे श्रावण क्वीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डांग सेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा मा.हेमलताताई बिडकर तर प्रमुख उपस्थितीत परीक्षक म्हणून मिस नाशिक ॲड एकता कदम मॅडम आणि मिस श्रीमती हर्षाली भोसले मॅडम,श्रीमती समिधा ताई जोशी श्रीमती वायकांडे मॅडम प्राचार्य अशोक नंदन पर्यवेक्षक कैलास देशमुख हे मान्यवर उपस्थितीत होते. सर्वप्रथम कर्मवीर दादासाहेब बिडकर,स्वर्गीय डॉ विजय बिडकर व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य नंदन सर यांनी केले.त्यानंतर सहभागी सर्व विद्यार्थिनींनी रॅम्पवॉक करत सादरीकरण केले.मुख्य परीक्षक ॲड एकता कदम मॅडम आणि हर्षाली भोसले मॅडम यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून पुढील स्पर्धेसाठी आवश्यक गोष्टी सांगितल्या.त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.ताईसाहेब यांनीही सर्व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना सांगितले की विद्यार्थिनींनी शिक्षणाबरोबरच इतर क्षेत्राततही प्रगती करावी अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रावण क्वीन होण्याचा प्रथम बहुमान कुमारी समृद्धी घोंगे (12 वी विज्ञान)द्वितीय क्रमांक कुमारी एकता कोतूळकर (12 वी विज्ञान)तृतीय क्रमांक कुमारी रोशनी ढोले(11 वी विज्ञान) या विद्यार्थिनींना देण्यात आला.तसेच बेस्ट हेअर स्टाईल संजना शिंदे, बेस्ट स्माईल श्रावणी गणोरे बेस्ट कॉस्टूम श्रावणी पवार यांना देण्यात आले . सर्व विजेत्या विद्यार्थिनींना प्रमुख मार्गदर्शक मिस एकता कदम मॅडम मिस हर्षाली भोसले मॅडम मा.ताईसाहेब,यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना व महिला कर्मचाऱ्यांना मा.समिधाताई जोशी यांच्या कडून भेटवस्तू देण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पवार मॅडम व सोनवणे एस.जे.यांनी केले.तसेच विद्यार्थिनींना प्रश्न डॉ.हाडपे मॅडम यांनी विचारले.या कार्यक्रमाचे आभार श्रीमती नाडेकर मॅडम यांनी मानले.यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
