डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे
🌹 स्वर्गीय डॉ.विजयजी बिडकर(बाबा)यांची जयंती साजरी 🌹
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 पेठ - दिनांक 01/04/2026 वार बुधवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे डांग सेवा मंडळ संस्थेचे माजी सचिव आरोग्यदूत,वाचनप्रेमी, क्रीडाप्रेमी,शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा विशेष ठसा उमटविणारे स्वर्गीय डॉ.विजयजी बिडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री.अशोक नंदन,पर्यवेक्षक,श्री.कैलास देशमुख वसतिगृह अधीक्षक श्री.जितेंद्र सूर्यवंशी,श्री.विनायक दोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वर्गीय डॉ.विजयजी बिडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.या प्रसंगी स्वर्गीय डॉ.विजयजी बिडकर यांच्या जयंती निमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यात विद्यार्थ्यांनी डॉ.साहेब यांच्या सामाजिक,शैक्षणिक कार्याचा परिचय करून दिला.तसेच शिक्षकांमधून श्री.तलवारे सर,श्री.थोरे सर,श्री.जाधव सर,श्री.चव्हाण सर,श्रीमती.गरुड मॅडम,श्रीमती.मोरे मॅडम,श्रीमती. जाधव मॅडम,श्रीमती.नाडेकर मॅडम यांनी डॉ.विजयजी बिडकर यांच्या जीवन कार्याचा परिचय व डॉ.साहेबांसोबत आलेले अनुभव कथन केले.त्यानंतर अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य श्री.नंदन सर यांनी डॉ.विजयजी बिडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग व साहेबांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान याविषयी माहिती दिली.तसेच डॉ.साहेबांच्या जयंती निमित्त विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.वाघमारे जे.एच.यांनी केले.यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षिका,वसतिगृह अधिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
