News Cover Image

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा

 विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा 
     
पेठ - आज दिनांक 06/12/2023 वार बुधवार रोजी डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे महामानव,बोधिसत्व, राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महारीनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला.यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्रीमती पवार मॅडम,श्री.चौधरी सर,श्री.देशमुख सर,श्री.शार्दुल सर,श्री.सातपुते सर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी कुमारी अपर्णा गावित व सोनाली गायकवाड या विद्यार्थिनींनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. तसेच ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती. आचार्य मॅडम, डॉ हाडपे मॅडम, श्री.शार्दुल सर व उपप्राचार्य श्रीमती पवार मॅडम यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती विद्यार्थ्यांना सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.जे.सोनवणे सर यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते