News Cover Image

डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे
🌹 क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा   🌹


         पेठ -दिनांक 09/08/2025 शनिवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे 9 ऑगस्ट क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.यावेळी पंचायत समिती पेठ चे माजी उपसभापती श्री महेशजी टोपले साहेब विद्यालयाचे प्राचार्य श्री.अशोक नंदन सर, उपमुख्याध्यापक,श्री.दिलीप केला सर,पर्यवेक्षक श्री.कैलास देशमुख सर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी मा.महेशजी टोपले साहेब यांचा विद्यालयाच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.यावेळी श्री.महेशजी टोपले यांनी आद्य क्रांतिकारक भाऊ माळेकर प्रतिष्ठान पेठ यांच्या वतीने इयत्ता 5 वी ते 12 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. विद्यार्थ्यांनी आदिवासी दिन व क्रांतीदिन यावर आधारित नृत्य सादर केले व मनोगतही व्यक्त केले.त्यानंतर श्री.महेश टोपले यांनी विद्यार्थ्यांना आदिवासी दिनाचे महत्व व शिक्षणाचे महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले.यानंतर उपमुख्याध्यापक श्री.केला सर यांनी क्रांतीदिन व आदिवासी दिनाचे महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले.तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री.नंदन सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व व स्वातंत्र्य लढ्यातील सर्व क्रांतिकारक यांनी देशासाठी दिलेले योगदान आपल्या मनोगतातून व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.जे.एच.वाघमारे सर यांनी केले.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.