News Cover Image

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,

डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे

🌹 शिक्षक दिन उत्साहात साजरा 🌹

                  पेठ -दिनांक 05/09/2026 शनिवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक कैलास देशमुख सर व विद्यार्थी प्राचार्य लदिती वाघेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले.त्यानंतर सर्व शिक्षकांचा विद्यार्थी शिक्षक यांनी स्वागत व सत्कार केला.यावेळी विद्यार्थी शिक्षक यांनी मनोगतातून आपले अनुभव व्यक्त केले.तसेच तलवारे सर,थोरे सर,श्रीमती हाडपे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा परिचय व जीवनात शिक्षणाचे महत्व पटवून दिले.तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक देशमुख सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचे महत्व व शिक्षक म्हणून राधाकृष्णन यांच्या जीवनातील अनेक अनुभव सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षिका कु.तबसुम अन्सारी व कु. मयुरी गावित यांनी केले.या वेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.