डांग सेवा मंडळ नाशिक संचलित
डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे गुरुपौर्णिमा साजरी.
पेठ दि.१०/०७/२०२५ गुरुवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.यावेळी डांग सेवा मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.दादासाहेब बिडकर,सचिव स्वर्गीय डॉ.विजयजी बिडकर व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या पर्यवेक्षक सौ.आचार्य मॅडम जेष्ठ शिक्षक श्री वेढणे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यानंतर श्री एस.जे.सोनवणे सर यांनी गुरुचें महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.त्यानंतर प्राचार्य श्री नंदन सर यांनीही विद्यार्थ्यांना गुरुचे महत्व आणि गुरु शिष्य नाते याबद्दल विचार मनोगतातून मांडले.
यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.