डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे
🌹 नशामुक्त भारत अभियान अंतर्गत जनजागृती 🌹
🌷🌷🌷🌷🌷🌷 पेठ -दिनांक 11/08/2026 मंगळवार रोजी नगरपंचायत पेठ,तहसील कार्यालय पेठ,यांच्यामार्फत विद्यालयात नशामुक्त भारत अभियानंतर्गत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी मा.तहसीलदार गवळी साहेब,पोलीस निरीक्षक मा.केदार साहेब पेठ नगरपंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.विसपुते साहेब, वैद्यकीय अधिकारी मा.जाधव साहेब,श्रीमती नम्रता गवळी मॅडम विद्यालयाचे प्राचार्य नंदन सर पर्यवेक्षक देशमुख सर हे प्रमुख उपस्थित होते.या प्रसंगी पोलीस निरीक्षक मा.केदार साहेब मा.तहसीलदार गवळी साहेब,वैद्यकीय अधिकारी मा.जाधव साहेब,श्रीमती श्वेता पवार मॅडम यांनी नशेचे सामाजिक,आरोग्यावर होणारे दुष्परिणाम मनोगतातून सांगितले.तसेच श्रीमती तृप्ती मकवाना मॅडम यांनी बालविवाह व त्याचे दुष्परिणाम याविषयी माहिती दिली त्यानंतर नशामुक्ती वर आधारित पथनाट्य सादर करून जनजागृती केली.तसेच नशामुक्ती ची शपथ घेण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोनवणे एस.जे.यांनी केले.तसेच या कार्यक्रमांचे आभार मुख्य कार्यकारी अधिकारी मा.विसपुते साहेब यांनी मानले.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
