डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे
हर घर तिरंगा घर घर तिरंगा या अंतर्गत प्रभात फेरीचे आयोजन
आज दिनांक 12/08/2025 वार मंगळवार रोजी हर घर तिरंगा घर घर तिरंगा अंतर्गत विद्यालयातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री.नंदन सर उपमुख्याध्यक श्री.केला सर पर्यवेक्षक श्री देशमुख सर ज्येष्ठ शिक्षक श्री.सातपुते सर हे प्रमुख उपस्थित होते. सर्व प्रथम विद्यार्थी व विद्यार्थिनींना घेऊन गावातून प्रभात फेरी काढण्यात आली व हर घर तिरंगा घर घर तिरंगा जनजागृती करण्यात आली.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.