डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे
🌹 भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी 🌹
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 पेठ -दिनांक 14/04/2026 वार मंगळवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री.अशोक नंदन,उपमुख्याध्यापक श्री.दिलीप केला,पर्यवेक्षक श्री.कैलास देशमुख,यांच्या प्रमुख उपस्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली.तसेच शिक्षकांमधून श्री.केदार सी.डी.श्री.गावित आर.टी.श्री.जाधव एन.के.श्री.वाघ के.जे.श्रीमती.राऊत मॅडम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा परिचय करून त्यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य सांगितले.त्यानंतर अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य श्री.नंदन सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देऊन राज्यघटनेचे महत्त्व सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोनवणे एस.जे.यांनी केले.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका वसतिगृह अधिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
