डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्याय पेठ येथे
79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
पेठ - दिनांक 15/08/2025 वार शुक्रवार रोजी डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे 79 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री.ए.एल.नंदन उपमुख्याध्यापक श्री. डी.जी.केला,पर्यवेक्षक श्री. के. के.देशमुख गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्व पालक आणि मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्मवीर दादासाहेब बिडकर, डॉ विजय बिडकर व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर मा प्राचार्य श्री.नंदन सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण श्रीमती.ब्राह्मणकर जे.आर.यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले.तसेच प्राचार्य श्री नंदन सर यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.श्री.सोनवणे एस.जे.यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल माहिती विद्यार्थ्यांना दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पठाडे सर,श्री.वाघमारे सर यांनी केले.यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.