News Cover Image

बेटी बचाव बेटी पढाव अभियान अंतर्गत रांगोळी स्पर्धा

पेठ -दिनांक १५/१२/२०२३ रोजी डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे बेटी बचाव बेटी पढाव अभियान अंतर्गत रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा,व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर.एम.पाटील,उपमुख्याध्यापक श्री.ए.एम.सागर,उपप्राचार्या श्रीमती.जे.पी.पवार,श्रीमती एम.सी.हाडपे हे प्रमुख उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी निबंध,रांगोळी व चित्रकला स्पर्धेतून जनजागृती केली.