डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे
🌹 हरितकुंभ सामूहिक वृक्षारोपण कार्यक्रम 🌹
पेठ -दिनांक 16/07/2025 बुधवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे "माझा कुंभ माझी जबाबदारी माझा वृक्ष माझी जबाबदारी" या उपक्रमांतर्गत विद्यालयात 50 वृक्षांची लागवड करण्यात आली.यावेळी श्री. डी.डी.घुगे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.बी.जी.राव वनपाल श्रीमती. एल.के.शेखरे वनरक्षक श्री बी.एस.महाजन वनरक्षक पेठ व विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.डी.जी.केला सर पर्यवेक्षक सौ.वसुधा आचार्य मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी श्री.एम.बी.परदेशी सर व श्री वाघमारे सर श्री व्ही.ए.अहिरे सर सौंदणे सर श्री भामरे सर यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने वृक्षारोपण करून घेतले.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
