News Cover Image

अल्पसख्यांक हक्क दिवस साजरा.

पेठ-दिनांक १८/१२/२०२३ रोजी डांग सेवा मंडळ नाशिक,संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात आला.यावेळी उपप्राचार्या श्रीमती.जे.पी.पवार,श्री.एच.एन.चौधरी,श्री.के.के.देशमुख,श्री के.वाय.शार्दुल हे प्रमुख उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांना अल्पसंख्यांक हक्क दिवसाचे महत्व,त्यांच्या योजना व कायदे या संदर्भात श्रीमती जे.पी.पवार यांनी मार्गदर्शन केले.यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.