डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे
🌹 शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा 🌹
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 पेठ -दिनांक 16/06/2025 सोमवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे शाळेचा पहिला दिवस शाळा प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री .ए.एल.नंदन उपमुख्याध्यापक श्री.डी.जी.केला, पर्यवेक्षक सौ.वसुधा आचार्य,ज्येष्ठ शिक्षक श्री प्रशांत वेढणे हे प्रमुख उपस्थित होते. सर्वप्रथम प्राचार्य श्री.नंदन सर यांनी इयत्ता पाचवीला नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.उपमुख्याध्यापक श्री केला सर व पर्यवेक्षक सौ.आचार्य मॅडम यांनीही विद्यार्थ्यांचे गुलाबपुष देऊन स्वागत केले.तसेच इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
