News Cover Image

परीक्षा पे चर्चा'‌ अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन

परीक्षा पे चर्चा'‌ अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे दि.२०जाने. २०२३ रोजी ठिक १०.३०वाजता परीक्षा पे चर्चा अंतर्गत इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकुण ५९६ विद्यार्थी सहभागी झाले होते.  यात सर्व प्रथम प्राचार्य श्री.राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना यास्पर्धे निमित्त  मार्गदर्शन केले.‌ तसेच उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी. यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष श्री संजय वाघ, तालुका उपाध्यक्ष श्री राजेंद्र गवळी, युवा कार्यकर्ते श्री गणेश गवळी, श्याम भुसारे, अंबादास भोये, वसंत गायकवाड,  उपप्रचार्य  श्री.वेढणे पी.आर., उपमुख्याध्यापक श्री.सागर ए.एम., पर्यवेक्षक श्री.केला डी .जी .व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी  व कार्यकर्ते उपस्थित होते. ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी चित्रकला शिक्षक श्रीमती हुंडीवाले ए.बी. व सर्व शिक्षक  यांनी परिश्रम घेतले.