डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे
🌹 श्रावण क्वीन स्पर्धेचे आयोजन 🌹
पेठ - दिनांक 20/08/2025 वार बुधवार रोजी डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे श्रावण क्वीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डांग सेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा मा.हेमलताताई बिडकर तर प्रमुख उपस्थितीत परीक्षक म्हणून ॲड एकता कदम मॅडम मिस नाशिक आणि श्रीमती प्रियंका खैरनार मॅडम होत्या तसेच पेठ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री गोंदके साहेबही प्रमुख उपस्थितीत होते.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री.ए.एल.नंदन उपमुख्याध्यक श्री.डी.जी.केला सर,पर्यवेक्षक श्री.के.के.देशमुख सर हे मान्यवर उपस्थितीत होते. सर्वप्रथम कर्मवीर दादासाहेब बिडकर,डॉ विजयजी बिडकर व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री नंदन सर यांनी केले.त्यानंतर सहभागी सर्व विद्यार्थिनींनी रॅम्पवॉक करत सादरीकरण केले. त्यानंतर मुख्य परीक्षक श्रीमती ॲड एकता कदम मॅडम यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.श्रीमती प्रियंका खैरनार मॅडम यांनीही विद्यार्थिनींना शुभेच्छा देऊन पुढील स्पर्धेसाठी आवश्यक गोष्टी सांगितल्या.त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.ताईसाहेब यांनीही सर्व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना सांगितले की विद्यार्थिनींनी शिक्षणाबरोबरच इतर क्षेत्राततही प्रगती करावी अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रावण क्वीन होण्याचा प्रथम बहुमान कुमारी समिधा चौधरी (11 वी विज्ञान)द्वितीय क्रमांक कुमारी सिद्धी पवार (12 वी विज्ञान)तृतीय क्रमांक कुमारी जान्हवी खैरनार (12 वी विज्ञान) या विद्यार्थिनींना देण्यात आला .तसेच बेस्ट हेअर स्टाईल मनिषा बामणे, बेस्ट स्माईल दामिनी खंबाईत बेस्ट कॉस्टूम निकिता गायकवाड यांना देण्यात आले . सर्व विजेत्या विद्यार्थिनींना प्रमुख मार्गदर्शक मिस एकता कदम मॅडम मा.ताईसाहेब,श्रीमती प्रियंका खैरनार मॅडम यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.जे.सोनवणे यांनी केले.तसेच विद्यार्थिनींना प्रश्न श्रीमती हाडपे मॅडम व श्री सूर्यवंशी सर यांनी विचारले.यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
