News Cover Image

मतदार साक्षरता क्लब ची स्थापना

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे मतदार साक्षरता क्लब ची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री पाटील आर एम सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पेठ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री प्रशांत जाधव साहेब होते. यावेळी नव मतदार विद्यार्थ्यांना मतदान नोंदणी विषयी मार्गदर्शन करण्यात आले. व मतदार साक्षरता क्लबची स्थापना करण्यात आली. यावेळी श्री जाधव साहेब यांनी मतदानाचे महत्त्व  प्रतिपादन केले. तसेच उपप्राचार्य श्रीमती पवार जे पी व श्री शार्दुल के वाय, यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेवटी श्री पाटील सर यांनी मतदान नोंदणी विषयी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व कनिष्ठ महाविद्यालीन शिक्षक हजर होते.