डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महा विद्यालय पेठ येथे गुरुपौर्णिमा साजरी
पेठ ता. 21 - डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉक्टर विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे आज गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यात सर्वप्रथम कनिष्ठ महाविद्यालायचे उपप्राचार्य श्रीमती आचार्य व्ही.सी.जेष्ठ शिक्षक वेढणे पी आर श्री शार्दुल के.वाय.यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वर्गीय दादासाहेब व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी श्री वेढणे सर यांनी गुरूंचे जीवनातील महत्व या बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच श्रीमती आचार्य मदम यांनीही विद्यार्थ्याना गुरु बद्दल अनेक उदाहरणे देऊन माहिती सांगितली .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोनवणे एस.जे. यांनी केले.यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.