डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे
🌹 राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी 🌹
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 पेठ -दिनांक 26/06/2025 गुरुवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री.ए.एल.नंदन पर्यवेक्षक सौ.वसुधा आचार्य,ज्येष्ठ शिक्षक श्री प्रशांत वेढणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले. सर्वप्रथम प्रा.श्री.सोनवणे एस.जे.यांनी विद्यार्थ्यांना शाहू महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करुन दिला.त्यानंतर श्री.वेढणे सर यांनी शाहू महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले.प्राचार्य श्री नंदन सर यांनीही विद्यार्थ्यांना शाहू महाराज यांचे जीवनकार्य व सामाजिक न्याय दिवसाचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोनवणे एस.जे.यांनी केले.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
