डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग पेठ येथे
🌹 क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी🌹
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 पेठ - दिनांक 28/11/2024 वार गुरूवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.मोरे एम.एस.उपप्राचार्य श्रीमती आचार्य व्ही.सी.व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख श्री वेढणे पी.आर.यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.तसेच शिक्षक श्री.गांगुर्डे सर,श्रीमती पठाडे मॅडम यांनी महात्मा फुले यांच्या जीवनातील विविध प्रसंगाचे अनुभव सांगितले.उपप्राचार्या श्रीमती आचार्य मॅडम यांनीही शिक्षणाचे महत्व सांगून महात्मा फुले यांना आदरांजली अर्पण केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री.मोरे सर यांनी अध्यक्षीय भाषणातून महात्मा फुले यांच्या जीवन कार्याचा सविस्तर परिचय करुन दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस.जे.सोनवणे यांनी केले.यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.