जागतिक दिव्यांग दिन साजरा
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय .पेठ येथे आज दि.03/12/2022 - शनिवार रोजी - कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला . आयोजित कार्यक्रमात विद्यार्थांना जागतिक दिव्यांग दिना निमित्त माहिती देण्यात आली . या कार्यक्रमाचे अध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री . आर . एम . पाटील सर उपस्थित होते . तसेच किमान कौशल्य विभागाचे उपप्राचार्य श्री . आहेर सर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती पवार . जे .पी . मॅडम उपस्थित होते . या कार्यक्रमा प्रसंगी दिव्यांग विभाग प्रमुख - श्री . परदेशी . एम . बी . श्री सातपुते सर, श्री . पगारे सर हाडपे मॅडम, उपप्राचार्या - पवार मॅडम यांनी विद्यार्थांना मागदर्शन केले . अध्यक्ष - श्री . पाटील सर यांचे अध्यक्षीय भाषण झाले . सहभागी विद्यार्थांनी आज च्या कार्यक्रमात भाषण केले . तर आचार्य मॅडम यांनी सुत्रसंचालन व प्रस्तावना केली . पठाडे मॅडम यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले . जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कनिष्ठ महाविद्यालयात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आली . या कार्यक्रमा प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते .