* विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या वेळेपूर्वी १० मिनिटे अगोदर उपस्थित राहिले पाहिजे. कॉलेजचे सर्व तासिकांना नियमित उपस्थित असावे.
* ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश आहे. विद्यार्थ्यांसाठी पांढरा शर्ट, पांढरी पँट, विद्यार्थ्यांनींसाठी गुलाबी पंजाबी ड्रेस, ओढणी.
* सर्व विद्यार्थ्यांनी दररोज गणवेशात उपस्थित राहणे आवश्यक आहे. गैरहजर राहू नये अन्यथा दंड रू. ५०/- आकारण्यात येईल.
* विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या वेळेमध्ये आपल्या कॉलेज बाहेरील मित्रांना बोलावू नये.
* विद्यार्थ्यांनी आपल्या सायकलीस व दुचाकी वाहनास कुलूप लावून व स्वतःच्या जबाबदारीवर ठेवावे.
* प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ओळखपत्र दररोज बरोबर आणलेच पाहिजे.
* शाळा आणि ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक, अधिकारी यांनी ओळखपत्र मागितल्याबरोबर सादर करणे आवश्यक आहे.
* शालेय वेळेत मोबाईल वापरता येणार नाही.